
सोलापूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। काकासाहेब थोबडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित कायदेविषयक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नवोदित वकिलांचा आकर्षक पद्धतीने सत्कार करण्यात आला असून सुमारे ४०० वकिलांची उपस्थिती लाभली.ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांनी “प्रोफेशनल एथिक्स अँड सक्सेसफुल लीगल प्रॅक्टिस” या विषयावर सुमारे ७० मिनिटांचे प्रेरणादायी व्याख्यान दिले. या व्याख्यानातून मिळालेल्या मार्गदर्शनाची आणि नवोदित वकिलांना झालेल्या सन्मानाची सर्वत्र चर्चा रंगली. तसेच Bar Council of Maharashtra and Goa तर्फे सीनियर लॉयर सन्मान प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विश्वनाथ आळंगे यांचा गौरव करण्यात आला.
ॲड. विश्वनाथ आळंगे यांनी मनोगत व्यक्त करताना ॲड. मिलिंद थोबडे यांच्या कार्याचे कौतुक करून पुरस्काराबद्दल आभार मानले.कार्यक्रमाला Solapur Bar Associationचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, सचिव बसवराज हिंगमिरे, सहसचिवा मीरा प्रसाद, खजिनदार अरविंद देडे तसेच ॲड. हिराचंद अंकलगी, ॲड. बसवराज सलगर, ॲड. राजेंद्र फताटे, ॲड. एम. डी. बिराजदार, ॲड. महादेव गोटे, ॲड. मिलिंद हरहरे, ॲड. दीक्षित, ॲड. उजळंबे, ॲड. अजय रणश्रुंगारे, ॲड. रवी सरवदे, ॲड. जालादी, ॲड. पी. बी. गायकवाड, ॲड. आर. एस. पाटील, ॲड. मल्लिनाथ पाटील, माजी सहसचिव ॲड. निदा सैफन व माजी सहसचिवा अल्का मोरे यांची उपस्थिती लाभली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड