परभणी - इनायत नगर येथील आरोग्य वर्धिनी केंद्राची महापौरांकडून पाहणी
परभणी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महानगरपालिकेच्या इनायत नगर येथील आरोग्य वर्धिनी केंद्र/प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कामकाजाची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान डॉ. नाहिद फातेमा, आरोग्य अधिकारी व त्यां
इनायत नगर येथील आरोग्य वर्धिनी केंद्राची महापौर सय्यद इकबाल यांची पाहणी


परभणी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।

महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी महानगरपालिकेच्या इनायत नगर येथील आरोग्य वर्धिनी केंद्र/प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कामकाजाची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान डॉ. नाहिद फातेमा, आरोग्य अधिकारी व त्यांच्या पथकाने महापौरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. केंद्रातील कार्यरत कर्मचारी व त्यांच्या माध्यमातून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या विविध आरोग्य सेवांची माहिती पीपीटी सादरीकरणाद्वारे देण्यात आली. महापौरांनी केंद्रात दररोज तपासणीस येणाऱ्या रुग्णांची संख्या, लसीकरणाची स्थिती, गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या सुविधा, विविध नोंदणी रजिस्टरची तपासणी तसेच केंद्राच्या आतील व बाहेरील स्वच्छतेची पाहणी केली. डॉ. नाहिद फातेमा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामकाजाचे त्यांनी कौतुक केले. सदर आरोग्य वर्धिनी केंद्र हे ‘रोल मॉडेल’ असल्याचे नमूद करत महानगरपालिकेतील इतर आरोग्य केंद्रेही याच धर्तीवर विकसित करण्याच्या सूचना महापौरांनी आरोग्य विभागास दिल्या.यावेळी महापौरांसमवेत गटनेते दिलीप ठाकुर, सदस्य राजेश रणखांबे व माजी सदस्य बुलबुले उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande