मिनीसरस “नंदिनी महोत्सव 2026” ला उत्साहात प्रारंभ
ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे दर्शन -खासदार गोवाल पाडवी नंदुरबार, 25 फेब्रुवारी (हिं.स.) नंदुरबारमध्ये भरविण्यात आलेले मिनीसरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन “नंदिनी महोत्सव” हा केवळ बचत गटांचा मेळावा नसून ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान
मिनीसरस “नंदिनी महोत्सव 2026” ला उत्साहात प्रारंभ


ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे दर्शन -खासदार गोवाल पाडवी

नंदुरबार, 25 फेब्रुवारी (हिं.स.) नंदुरबारमध्ये भरविण्यात आलेले मिनीसरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन “नंदिनी महोत्सव” हा केवळ बचत गटांचा मेळावा नसून ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन खासदार गोवाल पाडवी यांनी केले.

नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर लगतच्या डोममध्ये आजपासून “नंदिनी

महोत्सव 2026” ला प्रारंभ झाला. खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात

आले. हा महोत्सव 25 फेब्रुवारी ते 01 मार्च या कालावधीत पाच दिवस सुरू राहणार आहे. यामध्ये 80

बचत गटांच्या महिलांनी उत्पादित वस्तूंचे स्टॉल तसेच 20 खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्यासह अधिकारी-

कर्मचारी उपस्थित होते.

उमेद मॉलद्वारे बचत गटांना नवीन ओळख

केंद्र व राज्य शासन उमेद मॉलच्या माध्यमातून बचत गटांना नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करीत असून

जिल्हानिहाय सुमारे 20 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती खासदार

गोवाल पाडवी यांनी दिली. उमेद मॉलसाठी योग्य शासकीय जागेवर सुसज्ज व्यवस्था उभी करण्यासाठी

अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत तसेच केंद्र शासनाकडून बचत गटांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी

प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार ॲड. पाडवी यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळत बचत गट चळवळीच्या माध्यमातून आदिवासी

बहुल व दुर्गम नंदुरबार जिल्ह्याचे सकारात्मक चित्र राज्यात उभे करत असून जिल्ह्याचा नावलौकिक

वाढवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande