बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट घोटाळ्या संदर्भात ठेवीदारांचे मुंबईत आंदोलन
बीड, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। मागील काही वर्षांमध्ये ज्ञानराधा, राजस्थानी, साईराम, माँसाहेब जिजाऊ आदी मल्टिस्टेट घोटाळ्यामुळे हजारो सर्वसामान्य ठेवीदारांचे घामाचे आणि कष्टाचे पैसे अडकले आहेत. आयुष्यभराची कमाई सुरक्षित राहील या विश्वासाने ठेवलेल्या
अ


बीड, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। मागील काही वर्षांमध्ये ज्ञानराधा, राजस्थानी, साईराम, माँसाहेब जिजाऊ आदी मल्टिस्टेट घोटाळ्यामुळे हजारो सर्वसामान्य ठेवीदारांचे घामाचे आणि कष्टाचे पैसे अडकले आहेत. आयुष्यभराची कमाई सुरक्षित राहील या विश्वासाने ठेवलेल्या ठेवी आजही परत मिळालेल्या नाहीत, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. अशी प्रतिक्रिया बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या ठेवीदारांच्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. अनेक वर्षांपासून हे ठेवीदार आपल्या हक्काच्या पैशांसाठी संघर्ष करत आहेत. हा लढा केवळ पैशांसाठी नसून त्यांच्या सन्मान, विश्वास आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी आहे.व्यक्तिशः या प्रश्नावर शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु शासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता ठोस आणि वेळबद्ध निर्णय घेणे अत्यावश्यक आहे.

जर आपण सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाच्या पैशांचे संरक्षण करू शकत नसू, तर ही व्यवस्था कोणासाठी आहे?

ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायलाच पाहिजेत. शासनाने तात्काळ पुढे येऊन ठेवीदारांशी संवाद साधावा, पुनर्प्राप्ती प्रक्रियेला गती द्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर धोरण राबवावे.सर्वसामान्यांचा विश्वास टिकवणे हीच खरी जबाबदारी आहे. ठेवीदार बांधवांसोबत ठामपणे उभा आहे. असे आमदार क्षीरसागर म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande