छ. संभाजीनगर : ५ मार्चपासून नाथषष्ठी यात्रा होणार सुरू
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)राज्यातील पंढरपूरनंतर सर्वात मोठी नाथषष्ठी यात्रा ५ मार्चपासून सुरू होत असून त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केली आहे. नाथषष्ठीला साधारणपणे ५ ते ७ लाख भक्त वारकरी येणार असून या वारकऱ्यांना पहिल्यांदाच गोदावर
छ. संभाजीनगर : ५ मार्चपासून नाथषष्ठी यात्रा होणार सुरू


छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)राज्यातील पंढरपूरनंतर सर्वात मोठी नाथषष्ठी यात्रा ५ मार्चपासून सुरू होत असून त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केली आहे. नाथषष्ठीला साधारणपणे ५ ते ७ लाख भक्त वारकरी येणार असून या वारकऱ्यांना पहिल्यांदाच गोदावरी नदीच्या शुद्ध पाण्यात स्नान करता येणार आहे. तीन दिवसांपूर्वी गोदावरीची भव्य स्वच्छता अभियान राबवले. दूषित पाण्याचे नालेही बंद केले आहे. ते पाणी गोदावरीत जाणार नाही. यासाठी नगर

परिषदेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. परिणामी, गोदावरी मैलमिश्रित पाणी जाणार नसल्याने भाविकांना आता शुद्ध पाण्यात स्नान करता येणार आहे.

नाथषष्ठीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी तीरावर भाविकांची मोठी गर्दी होते. पवित्र स्नानासाठी परिसरात पहाटेपासूनच आठ दिवस. 'दक्षिण गंगा' म्हणून ओळख असलेल्या गोदावरीत स्नान केल्याने पापक्षालन होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. विशेष नाथ मंदिराच्या मागे स्नानाला धार्मिक महत्त्व आहे.

पर्यावरणप्रेमींकडून मात्र नदी स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. पूजासाहित्य (निर्माल्य) थेट नदीपात्रात टाकण्याऐवजी नगर परिषद ठेवलेल्या विशेष कुंडीतच टाकावे, असे आवाहन केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande