
* मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप !
मुंबई, 25 फेब्रुवारी (हिं.स.) - निवडणुकीच्या पूर्वी ‘जय भीम-जय मीम’च्या वल्गना करणारे राजकीय पक्ष निवडणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विसरतात आणि केवळ ‘जय मीम’च उरते. संविधानाच्या कुठल्या पानावर महानगरपालिकेत नमाज पठण करण्याची अनुमती आहे, याचे कागद त्यांनी मला दाखवावे, अशा परखड शब्दांत मंत्रीं नितेश राणे यांनी मालेगाव महानगरपालिकेतील नमाजपठणाच्या प्रकारावर जोरदार प्रहार केला. हे धर्मांधांचे ‘जिहाद’चेच रूप आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते विधानभवनात पत्रकारांशी बोलत होते.
आमदार नितेश राणे म्हणाले की, महानगरपालिकेत तुम्ही विकास करण्यासाठी निवडून गेला आहात की इस्लामचा प्रसार करण्यासाठी ? नमाज पडण्यासाठी मशिदींना काय टाळी लागली आहेत का? हे ‘जिहाद’ नाही, तर काय आहे ? जर उद्या आम्ही प्रत्येक महानगरपालिकेत भगवद्गीता वाचायला प्रारंभ केला, तर या ‘हिरव्या सापांनी’ तोंड उघडू नये. तुम्ही नमाज पडला तर चालते; पण हिंदूंनी काही केले की लगेच ‘हिंदू-मुस्लिम वाद’ उकरून काढला जातो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदरशात लहान मुलांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मदरसे हे केवळ आतंकवादाचे अड्डे असून तिथे देशविरोधी कृत्ये घडवली जातात. इस्लामिक राष्ट्रांमध्ये कुणी भगवद्गीता शिकवण्याची अनुमती देईल का ? मग आम्हीच मदरशांचे लाड का करायचे ? मदरशांमध्ये कधी शस्त्रास्त्रे सापडतात, तर कधी मुलांचे शोषण होते. मशिदीत कुराण शिकवा; पण धर्मांधतेचे धडे देणारे स्वतंत्र मदरसे कशाला हवेत ? महाराष्ट्रातील सर्व मदरसे तातडीने बंद करण्यात यावेत, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. मदरशात मुलांना मारहाण करणार्या मुल्ला-मौलवी यांना चेतावणी देताना श्री. नितेश राणे म्हणाले की, मी त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यांना असा काही धडा शिकवीन की, पुन्हा हात उचलताना ते १० वेळा विचार करतील. हे जिहादी मानसिकतेचे लोक केवळ हिंसाच जाणतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी