
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा व वाडःमय विभागात मायमराठी गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीताच्या मात्रांवर गीत लेखन कसे करायचे, शब्द कसे निवडायचे, गुंफलेल्या शब्दांची चाल बांधून संगीतबद्ध कसे करायचे, याची एक कार्यशाळा मराठवाड्यातील नवोदित कवी, रसिक व कलावंतांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मायमराठी गौरव महोत्सवाचे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भाषा व वाङमय विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा समारोप गीतलेखन कार्यशाळा व प्रा. वा. ल. कुळकर्णी व्याख्यानमालेने होणार आहे.
प्रसिद्ध गीतकार, संगीतकार मिलिंद जोशी (मुंबई) यांच्या मार्गदर्शनातून मराठी विभागात २७ फेब्रुवारी रोजेी दुपारी १२ वाजता गीतलेखनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती माहिती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ.प्रशांत अमृतकर, मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.दासू वैद्य व विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) मंजूषा मिसकर यांनी दिली.
दि.२६ रोजी निमंत्रितांचे कविसंमेलन होेणार आहे. यामध्ये वृषाली किन्हाळकर (नांदेड), संजय चौधरी (नाशिक), किरण येले (मुंबई), विनायक पवार (पेण), वैभव देशमुख (पुणे) व सुनील उबाळे (छत्रपती संभाजीनगर) यांचा सहभाग राहणार आहेत. सायंकाळी पाच वाजता विद्यापीठाच्या नाट्यगृहात हे कविसंमेलन होणार आहे. चार दिवस चालणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, विद्यापीठाबाहेरील जिज्ञासू, अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य, अप्पर आयुक्त मंजुषा मिसकर व संचालक डॉ.वैâलास अंभुरे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis