नांदेड-उमरी नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रविण सारडा व एजाज खान यांची निवड
नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)उमरी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २० पैकी नगरध्यक्षसह १८ नगरसेवक निवडून आले. १८ नगरसेवक निवडून आल्याने यांच्या गटांना दोन स्वीकृत सदस्य पदाची संधी मिळाली त्यात राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष प्रवीण
नांदेड-उमरी नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रविण सारडा व एजाज खान यांची निवड


नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)उमरी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २० पैकी नगरध्यक्षसह १८ नगरसेवक निवडून आले. १८ नगरसेवक निवडून आल्याने यांच्या गटांना दोन स्वीकृत सदस्य पदाची संधी मिळाली त्यात राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष प्रवीण बाबू राजा सारडा तर एजाज खान अहमद खान यांची स्वीकृत सदस्य पदी निवड करण्यात आल्याची घोषणा नगराध्यक्षा सौ. शंकुतला मुदिराज व उपनगराध्यक्ष कैलासराव देशमुख गोरठेकर यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी गणेश चाटे यांनी केली आहे.

यावेळी गटनेता राजेश जाधव, बांधकाम सभापती संदिप चंदनवार, नियोजन सभापती विष्णु नंदकिशोर पंडीत, महिला व बालकल्याण सभापती निकीता सिंगरवाड, नगरसेविका श्रीमती अनुसयाबाई कटकदवणे,शशिकलाबाई झडते, रतन खंदारे, साईनाथ जमदाडे, सायली कुलकर्णी उपस्थित होते.

स्वीकृत सदस्य पदी प्रविण सारडा व एजाज खान यांची एकमताने निवड झाल्याने पालीकेच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

-

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande