छ.संभाजीनगर-फुलंब्री येथील गट नंबर १७ मधील NA प्रकरणाबाबत नागरिकांना दिलासा देणारा
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)फुलंब्री येथील गट नंबर १७ मधील बोगस NA प्रकरणाबाबत नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान महसूलमंत्री चंद्रशे
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)फुलंब्री येथील गट नंबर १७ मधील बोगस NA प्रकरणाबाबत नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना विशेष बाब म्हणून गट नंबर १७ मधील सर्व प्लॉट नियमित करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. आचारसंहिता लागू असल्यामुळे पुढील बैठक होऊ शकली नव्हती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा विषय मार्गी लागला असून ३१ मार्चपर्यंत गट नंबर १७ मधील सर्व प्लॉट नियमित करण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी श्री.बाफना, नगरविकास विभागाचे श्री.भालेराव, तहसीलदार योगिता खटावकर, श्री.योगेश पाथ्रीकर, सर्व प्लॉटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande