सोलापूर - प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भांगे यांना आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान
सोलापूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, डॉक्टर, पत्रकार व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी मुंबई येथे आयोजित “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” आणि “महाआरोग्य सन्मान २०२६” वितरण सोह
सोलापूर - प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भांगे यांना आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान


सोलापूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, डॉक्टर, पत्रकार व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी मुंबई येथे आयोजित “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” आणि “महाआरोग्य सन्मान २०२६” वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण केंद्र येथे उत्साहात पार पडला. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडी येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विकास भांगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आरोग्यरत्न पुरस्कारांतर्गत २३ मान्यवरांना प्रत्येकी एक लाख रुपये, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच राज्यातील विविध स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १७४ डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांना “महाआरोग्य सन्मान २०२६” देण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आदींचा यामध्ये समावेश होता.यावेळी “उपचारांपलीकडची शासनाची साथ” या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दीर्घकालीन व असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेदनानियंत्रण, मानसिक आधार व घरपोच सेवा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच राज्यातील ५८० ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ‘मोनोपॉज क्लिनिक’ उपक्रमाचे राज्यस्तरीय लोकार्पण करण्यात आले. दर बुधवारी विशेष ओपीडीद्वारे महिलांना समुपदेशन व उपचार सेवा देण्यात येणार आहे.आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे कर्मचारी नागरिकांसाठी ‘देवदूत’ ठरू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. बोर्डीकर यांनी महिला आरोग्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी मोनोपॉज क्लिनिक उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande