पुण्यात ‘पीसीपीएनडीटी’ ऑनलाइन प्रणाली कागदावरच
पुणे, 25 फेब्रुवारी (हिं.स.)गर्भधारणापूर्व व गर्भलिंग निदान प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत नवीन सोनोग्राफी मशिन बसविणे, जुने मशिन काढून टाकणे, परवाना नूतनीकरण तसेच रेडिओलॉजिस्ट रुजू किंवा कार्यमुक्त झाल्याची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष अर्ज
पुण्यात ‘पीसीपीएनडीटी’ ऑनलाइन प्रणाली कागदावरच


पुणे, 25 फेब्रुवारी (हिं.स.)गर्भधारणापूर्व व गर्भलिंग निदान प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत नवीन सोनोग्राफी मशिन बसविणे, जुने मशिन काढून टाकणे, परवाना नूतनीकरण तसेच रेडिओलॉजिस्ट रुजू किंवा कार्यमुक्त झाल्याची माहिती देण्यासाठी प्रत्यक्ष अर्ज करावे लागत असल्याने ऑनलाइन सेवा केवळ कागदावर असल्याचा मुद्दा खासगी डॉक्टरांनी महापालिकेच्या लक्षात आणून दिला आहे. मनपाचा आरोग्य विभाग आणि इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ‘पीसीपीएनडीटी’बाबत विशेष कार्यशाळा आयोजित केली होती.

कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. संतोष कांगुळे, आएमए महाराष्ट्रच्या अध्यक्ष (नियुक्त) डॉ. मंजूषा गिरी, महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे, आयएमए महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महापौर मंजूषा नागपुरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande