
पुणे, 25 फेब्रुवारी, (हिं.स.) - पुणे शहराला ‘क्रीडा पंढरी’ म्हणून ओळखले जाते. याच ओळखीला अधिक बळकटी देण्यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 102 कोटी 60 लाख 34 हजार रुपयांचा भव्य जमा-खर्चाचा आराखडा तयार केला आहे.मागील वर्षाच्या तुलनेत या प्रस्तावित तरतुदीमध्ये मोठी वाढ केली असून, यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा आणि खेळाडूंसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांवर भर देण्यात आला आहे. या आराखड्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ऐतिहासिक पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमचे नूतनीकरणाचे आहे.
मैदानाचे 10 वर्षांपासून नूतनीकरण झालेले नाही, त्यामुळे त्यासाठी 15 कोटींची भरीव तरतूद प्रस्तावित आहे. तसेच या स्टेडियममध्ये रात्रीचे सामने खेळवण्यासाठी नवीन विद्युत व्यवस्था आणि जनरेटर सेट खरेदी करण्यासाठी 3 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेतक्रीडा धोरण 2018 अंतर्गत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सरावासाठी 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य आणि खेळाडू अपघात विमा योजनेसाठी 25 लाख रुपयांची तरतूद आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार आणि गुणवंत खेळाडूंना पुरस्कार देण्यासाठी सुमारे 30 लाख रुपये प्रस्तावित आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु