
लातूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर, ई-चलान मशिनव्दारे ट्रिपल सिट,
ॲटो- दंडात्मक कार्यवाही तसेच मोठे आवाज करणारे बुलेट सायलन्स (इंदौरी फटका) बसवणे चालकाविरूध्द कलम-२८१ भारतीय न्याय संहिता-२०२३, कलम १८४,१९८ मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम-१९८९ चे कलम १२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची विशेष मोहिम राबवण्यासाठी पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार लातूर शहरातील नियम बाहय वाहनावर बेशिस्त पार्क करणारे चार चाकी, दुचाकी वाहनावर तसेच
ॲटॲटोमधील, टेप, स्पिकर, एलएडी लाईट, बेशिस्त रिंगरोडवर तसेच सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर, ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कार्यवाही तसेच बुलेट भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवित बुलेट सायलन्स (इंदौरी फटका) मोठे आवाज करून फिरणारे, बुलेटला सायलेन्सर अनाधिकृतरित्या बदल केलेले फटाका आवाज करणारे, मॉडीफाय मफलर सायलेंसर वाहनावर वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर येथे घेवून अनाधिकृत बदल केलेले सायलेंन्सरचा ध्वनी क्षेपक मोजणी यंत्रावरून कर्णकर्कश आवाजाची क्षमता तपासणी करून जास्त डेसीबल इतका आवाज येत असल्याचे मिळून आल्यावर त्या चालकाविरूध्द त्यांच्यावर वेगवेगळया पोलीस स्टेशनला कलम-२८१ भारतीय न्याय संहिता-२०२३, कलम-१८४,१९८ मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ चे कलम १२० प्रमाणे एकूण ०८ बुलेट चालकाविरूध्द पो.स्टे. शिवाजीनगर, पो.स्टे. गांधी चौक, पो.स्टे. विवेकानंद चौक, व पो.स्टे. एमआयडीसी गुन्हे दाखल करण्यात आले. आणि त्यातून विक्री करणारे इसमांचा शोध घेऊन त्यांचे विरुध्द त्यांना सह आरोपी करण्याची प्रक्रीया सुरु केलेली आहे. तसेच अशा प्रकारचे मॉडिफाईड सायलेसर बसवणारे गॅरेज मेकॅनिक यांना बोलावून घेऊन अशा प्रकारचे सायलेंसर न बसवणेबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. तसेच पार्कीगमध्ये रोडचे कडेला थांबलेले बुलेट यांचे चालकास बोलावून त्यांचे सायलन्सर असे ०७ जप्त करण्यात आले व पाठीमागील थकीत ई-चलान दंड ई-चलान मशिनव्दारे भरून त्यांना कायदेशिर पावती देण्यात आली आहे. सदर मोहीम पुढेही राबविण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis