रत्नागिरी : राजापूर पालिकेचे २ कोटी ४ लाख ६० हजाराचे अंदाजपत्रक मंजूर
रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : कोणतीही करवाढ नसलेल्या राजापूर नगरपालिकेच्या २ कोटी ४ लाख ६० हजार १७० रुपये शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. या अंदाजपत्रकात प्रथमच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी दीड लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे
रत्नागिरी : राजापूर पालिकेचे २ कोटी ४ लाख ६० हजाराचे अंदाजपत्रक मंजूर


रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : कोणतीही करवाढ नसलेल्या राजापूर नगरपालिकेच्या २ कोटी ४ लाख ६० हजार १७० रुपये शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.

या अंदाजपत्रकात प्रथमच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी दीड लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. नवीन वाहन खरेदीसाठी २० लाखाची तरतूद करतानाच नगरसेवकांच्या प्रशिक्षणासाठी पाच लाखाची तरतूद करण्यात आली आहे.

नगराध्यक्षा अॅड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या वतीने कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी सन २०२६-२७ चे वार्षिक अंदाजपत्रक सादर केले. यावेळी उपनगराध्यक्ष विनय गुरव आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.

शासनाकडून रस्ते, पाणीपुरवठा, नगरोत्थान व अन्य योजनांतुन यावर्षी जास्तीत जास्त निधी उपलब्ध होईल, अशी तरतूद भांडवली जमेत करण्यात आली आहे. यावर्षी पाणीपट्टी व मालमत्ता कराची १०० टक्के वसुली करण्याचा निर्धार करण्यात आला असून यासाठी नागरिकांबरोबरच नगरसेवकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले.

अंदाजपत्रकावरील चर्चेत दोन्ही गटातील नगरसेवकांनी सहभाग घेत आपली मते मांडली. सगळ्यांच्या सूचनांचे स्वागत करून आवश्यक ते बदल व तरतुदी करून या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार एकूण महसुली व भांडवली जमा ६७ कोटी ४४ लाख ८३ हजार ६२८ तर एकूण महसुली व भांडवली खर्च ६५ कोटी ४० लाख २३ हजार ४५८ इतका आहे. शिल्लक २ कोटी ४ लाख ६० हजार १७० इतकी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande