
परभणी, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
पुर्णा तालुक्यातील ऊळगाव दुधाटे येथे रानमेवा कृषी पर्यटन प्रकल्पाचा शुभारंभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील समुदायिक विस्तार व संदेश विभागाचे प्रमुख डॉ. शंकरराव पुरी यांच्या हस्ते करण्यात आला.प्रा. शोभा दुधाटे-जाधव यांच्या संकल्पनेतून देऊळगाव दुधाटे, उमरथडी येथील शेतकरी व गावकऱ्यांसाठी हा प्रकल्प उभारल्या जात हे. या प्रकल्पांतर्गत गोदावरी नदीपात्रात अत्याधुनिक नौकाविहार सेवा उपलबध करुन देण्यात आली आहे. देऊळगाव दुधाटे आणि उमरथडी या गोदावरी नदी काठावरील गावांना ही नौका पुरजन्य परस्थितीत सुरक्षात्मक प्रवासासाठी फायदेशीर ठरणार आहे. गोदावरी नदीचे विहंगमय दृश्य, देऊळगाव दुधाटेच वैभव वैकुंठाधाम स्मशानभूमी, जिजाऊ स्मृतीस्थळ व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाहण्यासाठी आलेल्या नागरीकांना नौकाविहाराचा आनंद घेता येणार आहे. विशेषत: देऊळगाव आणि उमरथडी येथील शेतकरी बांधवांसाठी ही नौका फायदेशीर ठरणार आहे. नदीपात्राचे अंतर पार करण्यासाठी लोखंडी कलईचे चाटू मारण्याचे श्रम वाचणार वाचणार असून प्रवासही सुरक्षित आणि आनंददायी होणार आहे.रानमेवा कृषी पर्यटन प्रकल्पाच्या या उपक्रमाचे दोन्ही गावातील ग्रामस्थ व शेतकरी बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे. बुधवारी जिजाऊ स्मृतीस्थळ येथे पार पडलेल्या या शुभारंभासाठी डॉ. विजय खेडकर, डॉ. भारत साखरे, गजानन टेाळे, आळंदकर,कैलासराव जाधव, रंगनाथराव दुधाटे, भगवानराव दुधाटे, विठ्ठलराव दुधाटे यांच्यासह देऊळगाव दुधाटे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis