बीड जिल्ह्यातील ठेवीदारांच्या आंदोलनाला न्याय्य मागण्यांना आ. धस यांचा जाहीर पाठिंबा
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.) | ज्ञानराधा, राजस्थानी, साईराम माँसाहेब जिजाऊ, मराठवाडा अर्बन (माजलगाव), लक्ष्मीमाता अर्बन, छत्रपती, मुक्ताई, शुभ कल्याण यांसह इतर मल्टीस्टेट संस्थांमधील ठेवीदारांचे पैसे तात्काळ परत मिळावेत. अशी मागणी आष्टी विधानसभा मतद
अ


बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.) | ज्ञानराधा, राजस्थानी, साईराम माँसाहेब जिजाऊ, मराठवाडा अर्बन (माजलगाव), लक्ष्मीमाता अर्बन, छत्रपती, मुक्ताई, शुभ कल्याण यांसह इतर मल्टीस्टेट संस्थांमधील ठेवीदारांचे पैसे तात्काळ परत मिळावेत. अशी मागणी आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेच्या लिलावाच्या तारखा जाहीर कराव्यात. संचालक व त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्ता जप्त कराव्यात.तसेच तीसगाव डेअरी व फलटण डेअरी जप्त कराव्यात.ज्ञानराधा मल्टीस्टेटचे फॉरेन्सिक ऑडिट तात्काळ करावे.ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावाच्या तारखा जाहीर कराव्यात.प्रलंबित MPID प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत. या मागण्यांसाठी प्रा. सचिन उबाळे पाटील, ठेवीदार संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या ठेवीदारांच्या आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande