लातूर : श्री सिध्देश्वरास १००१ महिलांकडून रुद्राभिषेक
लातूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.) महाशिवरात्रीचे औचित्य साधून लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानकडून यात्रा महोत्सव सुरु आहे. या महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. याचाच एक भाग म्
रुद्राभिषेक


लातूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.) महाशिवरात्रीचे औचित्य साधून लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानकडून यात्रा महोत्सव सुरु आहे. या महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. याचाच एक भाग म्हणून श्री सिध्देश्वरास १००१ महिलांकडून रुद्राभिषेक करण्यात आला आहे. यासाठी सुखदा मांडे, संजिवनी येरटे व वर्षा गोजमगुंडे यांनी पुढाकार घेतला होता.

श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने सुरु असलेल्या यात्रा महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासह शेतकयांसाठी व महिलांसाठीही कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. यानिमित्ताने शहरातील १००१ महिलांना एकत्रित करून ग्रामदैवत श्री सिध्देश्वरास रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी या महिलांनी एक साथ एका सुरात अभिषेकाच्या निमित्ताने विविध मंत्रोच्चार केले. यामुळे देवस्थान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालेले पाहण्यास मिळाले. रुद्राभिषेकानंतर महिलांनी श्री सिध्देश्वराची महाआरतीही केली. या कार्यक्रमासाठी शहरातील महिलांना एकत्रित आणण्याकरिता सुखदा मांडे, संजिवनी येरटे व वर्षा गोजमगुंडे यांनी पुढाकार घेतला होता. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल देवस्थानच्या वतीने या तिघींचाही यथोचित सत्कार करण्यात करून महाप्रसाद वाटप करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande