रत्नागिरी : भागोजीशेठ कीर जयंतीनिमित्त पतितपावन मंदिरात सहभोजन
रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : समाजातील समता, बंधुभाव आणि दानशूरतेचा संदेश देणारे ज्येष्ठ समाजसेवक भागोजीशेठ कीर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीच्या पतितपावन मंदिरात सहभोजन पार पडले. यानिमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध सामाजि
पतितपावन मंदिरात सहभोज


रत्नागिरी, 25 फेब्रुवारी, (हिं. स.) : समाजातील समता, बंधुभाव आणि दानशूरतेचा संदेश देणारे ज्येष्ठ समाजसेवक भागोजीशेठ कीर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरीच्या पतितपावन मंदिरात सहभोजन पार पडले.

यानिमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे आणि नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

भागोजीशेठ कीर आपल्या दानशूर वृत्तीमुळे ओळखले जातात. शिक्षण, सामाजिक कार्य आणि सर्वसमावेशकतेच्या विचारांचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

त्यांच्या जयंतीनिमित्त शहरातील पतितपावन मंदिर येथे सहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. होते. रत्नागिरीत १९३० साली झालेल्या पहिल्या सहभोजनाच्या ऐतिहासिक परंपरेला पुढे नेणारा हा उपक्रम आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत पार पडलेल्या सहभोजनात विविध समाजघटकांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमामुळे समाजातील समता, बंधुभाव आणि परस्पर सन्मानाची मूल्ये अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande