नांदेड येथे गायन, वादन यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)गायन, वादन यासह सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या संगीत शंकर दरबारची महाराष्ट्रामध्ये एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली असून नांदेडकरांना संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. संगीत शंकर दरबारचे हे २२ व
नांदेड येथे गायन, वादन यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल


नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)गायन, वादन यासह सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या संगीत शंकर दरबारची महाराष्ट्रामध्ये एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली असून नांदेडकरांना संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. संगीत शंकर दरबारचे हे २२ वे वर्ष आहे. यशवंत महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात कार्यक्रम आयोजित केले आहे

याच कार्यक्रमात डॉ. राम बोरगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. अनुपमा जोशी यांचे सरोद वादन, रुचिरा केदार व पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाचा आस्वाद नांदेडकरांना मिळणार आहे.

२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमास माजी आ.सौ. अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार असून यावेळी शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्या अॅड. सुजयाताई चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.त्यानंतर आदित्य मोडक व अनुराधा कुबेर यांचे शास्त्रीय गायन तसेच डॉ. मैसूर मंजुनाथ व मैसूर नागराज यांची व्हायोलीन जुगलबंदी पहावयास मिळणार आहे.

२७ रोजी सकाळी ६ वाजता कुसुम सभागृहात मंगेश बोरगावकर व संच यांचा माय मराठी, सूर मराठी या कार्यक्रमाचे मराठी दिनानिमित्त आयोजन करण्यात आले आहे.याचे उद्घाटन माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या संगीत शंकर दरबार सोहळ्यास हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी.पी. सावंत, सह सचिव डॉ. रावसाहेब शेंदारकर व कोषाध्यक्ष ऍड. उदय निंबाळकर यांनी केले आहे. नांदेडकरांना या निमित्ताने एक मोठी सांस्कृतिक मेजवानी मिळाली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande