थळ औद्योगिक पट्ट्यातील बांधकामावर प्रश्नचिन्ह
रायगड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील मुशेत गाव सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. थळ येथील आरसीएफ प्रकल्पाच्या रेल्वे मार्गिकेजवळ सुरू असलेल्या मोठ्या बांधकामामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गंग
अलिबाग तालुक्यातील मुशेत गाव सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. थळ येथील आरसीएफ प्रकल्पाच्या रेल्वे मार्गिकेजवळ सुरू असलेल्या मोठ्या बांधकामामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी यासंदर्भात आरसीएफचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.   सावंत यांच्या तक्रारीनुसार, आरसीएफ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अटींनुसार रेल्वे मार्गिकेपासून कोणतेही बांधकाम किमान 30 मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र मुशेत येथील गट क्र. 111/अ/1/9 मध्ये क्षितीज बिल्डकॉन कंपनीकडून एम.आर. कंपनीसाठी अवघ्या 5 ते 10 मीटर अंतरावर आरएमसी प्लांट व इतर बांधकामे सुरू असल्याचा आरोप आहे.   थळ येथील आरसीएफ हा देशातील महत्त्वाचा औद्योगिक प्रकल्प असून कच्चा माल आणि खतांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर रेल्वेमार्गे केली जाते. अशा स्थितीत रेल्वे मार्गिकेजवळ अवजड यंत्रसामग्री, काँक्रीट मिक्सिंग प्लांट आणि सततची वाहनांची ये-जा सुरू असल्यास भविष्यात अपघाताची शक्यता वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.   दरम्यान, ग्रुप ग्रामपंचायत मापगाव प्रशासनानेही या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 17 ऑक्टोबर 2025 आणि 15 डिसेंबर 2025 रोजी नोटीस देऊनही संबंधित कंपनीकडून काम थांबविण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. अवजड वाहनांमुळे सार्वजनिक रस्त्यांची दुरवस्था झाली असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.   या प्रकरणी संबंधित कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच प्रशासनाकडूनही ठोस प्रतिक्रिया आलेली नसल्याने प्रश्नचिन्ह कायम आहे. नियमांचे पालन झाले आहे का, याची अधिकृत मोजणी व चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.     ---------------

रायगड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।

अलिबाग तालुक्यातील मुशेत गाव सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. थळ येथील आरसीएफ प्रकल्पाच्या रेल्वे मार्गिकेजवळ सुरू असलेल्या मोठ्या बांधकामामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी यासंदर्भात आरसीएफचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

सावंत यांच्या तक्रारीनुसार, आरसीएफ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अटींनुसार रेल्वे मार्गिकेपासून कोणतेही बांधकाम किमान 30 मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र मुशेत येथील गट क्र. 111/अ/1/9 मध्ये क्षितीज बिल्डकॉन कंपनीकडून एम.आर. कंपनीसाठी अवघ्या 5 ते 10 मीटर अंतरावर आरएमसी प्लांट व इतर बांधकामे सुरू असल्याचा आरोप आहे.

थळ येथील आरसीएफ हा देशातील महत्त्वाचा औद्योगिक प्रकल्प असून कच्चा माल आणि खतांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर रेल्वेमार्गे केली जाते. अशा स्थितीत रेल्वे मार्गिकेजवळ अवजड यंत्रसामग्री, काँक्रीट मिक्सिंग प्लांट आणि सततची वाहनांची ये-जा सुरू असल्यास भविष्यात अपघाताची शक्यता वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ग्रुप ग्रामपंचायत मापगाव प्रशासनानेही या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 17 ऑक्टोबर 2025 आणि 15 डिसेंबर 2025 रोजी नोटीस देऊनही संबंधित कंपनीकडून काम थांबविण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे. अवजड वाहनांमुळे सार्वजनिक रस्त्यांची दुरवस्था झाली असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

या प्रकरणी संबंधित कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच प्रशासनाकडूनही ठोस प्रतिक्रिया आलेली नसल्याने प्रश्नचिन्ह कायम आहे. नियमांचे पालन झाले आहे का, याची अधिकृत मोजणी व चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके

 rajesh pande