
सोलापूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘राष्ट्र प्रथम’ अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ६७० शाळांमधील चौथी ते आठवीपर्यंतच्या मुलींना स्वसंरक्षणाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यभरातील शाळांमध्ये हे प्रशिक्षण सुरु आहे.माजी सैनिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लष्करी शिस्तीचे धडे दिले जाणार आहेत.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून हे अभियान १५ जानेवारी २०२६ पासून सुरू झाले असून, २० मार्च २०२६ पर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. यामध्ये विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मुलींना केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम न करता त्यांना मानसिकदृष्ट्याही कणखर बनविण्यावर भर दिला आहे. यात तायक्वांदो, कराटे, ज्यूदो, क्राव मागा, बॉक्सिंग यांसारख्या मार्शल आर्ट्सचा समावेश आहे. तसेच योगासने आणि प्राणायामाद्वारे मानसिक स्वास्थ्यावर काम केले जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड