‘जिका’च्या वरिष्ठ शिष्टमंडळाची वसई–विरार पालिकेला भेट
पालघर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। देशातील महत्त्वाकांक्षी मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प (बुलेट ट्रेन) संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था जिकाच्या वरिष्ठ सदस्यांनी वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयाला भेट दिली. या बैठकीत प्रकल्पा
मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग; ‘जिका’च्या वरिष्ठ शिष्टमंडळाची वसई–विरार पालिकेला भेट


पालघर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। देशातील महत्त्वाकांक्षी मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प (बुलेट ट्रेन) संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था जिकाच्या वरिष्ठ सदस्यांनी वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयाला भेट दिली. या बैठकीत प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा तसेच आगामी कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत प्रकल्पाचा मार्ग, वसई–विरार क्षेत्रातील स्थानकांचे नियोजन, रेल्वे कॉरिडॉर व शहर नियोजनातील समन्वय, तसेच वेळेत काम पूर्ण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याबाबत सखोल चर्चा झाली. हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे मुंबई आणि अहमदाबाददरम्यानचा प्रवास अधिक वेगवान व सुखकर होणार असून, या भेटीमुळे कामाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

या बैठकीला महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, माजी आमदार क्षितीज ठाकूर आणि सभागृह नेते प्रफुल्ल साने उपस्थित होते. प्रशासनाकडून अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत, परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव, उपसंचालक नगररचना मनीष भिष्णरकर, नगररचनाकार श्वेता माने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.

जिका संस्थेचे प्रमुख सेईचिरो अकीमुरा आणि त्यांच्या पथकाने प्रकल्पाच्या तांत्रिक व अंमलबजावणीच्या पैलूंवर सविस्तर चर्चा केली. यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसमोर हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande