एस.टी. स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ सोलापुरात उत्साहात
सोलापूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात डिजिटल क्रांती घडविणाऱ्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) आधारित एस.टी. स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ सोलापुरात उत्साहात पार पडला. रोख रकमेविना, सुरक्षित आणि सु
Rajmata Bus ST


सोलापूर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात डिजिटल क्रांती घडविणाऱ्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) आधारित एस.टी. स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ सोलापुरात उत्साहात पार पडला. रोख रकमेविना, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा देणारा हा उपक्रम प्रवाशांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक प्रशांत पल्ली, विभागीय यंत्र अभियंता शितल बिराजदार परशुराम नकाते (विभागीय वाहतूक अधिकारी), नागेश जाधव (आगार व्यवस्थापक), सांख्यिकी अधिकारी कोलगे साहेब, स्थानक प्रमुख मल्लिनाथ अंजोटगी, वाहतूक निरीक्षक अक्षय वाघमारे, विनोद भोसले, एबिक्स कॅश चे सर्वेश घाडगे, महेश कस्तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हे स्मार्ट कार्ड RuPay Prepaid प्लॅटिनम स्वरूपात उपलब्ध असून NCMC प्रणालीवर आधारित आहे. या कार्डच्या माध्यमातून एस.टी. प्रवास अधिक वेगवान, पारदर्शक व सुरक्षित होणार असून भविष्यात इतर डिजिटल व्यवहारांसाठीही याचा उपयोग करता येणार आहे. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी व पत्रकार यांना या सुविधेचा लाभ होणार आहे.यावेळी बोलताना महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, “डिजिटल व्यवहारांना चालना देत एस.टी. प्रवास अधिक आधुनिक करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande