
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।
सिल्लोड येथे शासकीय मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे केली.
सिल्लोड तालुक्यात खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर मका पिकाचे उत्पादन घेतले जाते. यंदा उत्पादन समाधानकारक झाले असले तरी बाजारातील दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. स्थानिक पातळीवर शासकीय खरेदी केंद्र उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे किंवा इतर ठिकाणी जाऊन विक्री करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूक व इतर खर्च वाढून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठीसिल्लोड येथे तात्का शासकीय मका खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, तोलकाटा, गोदाम व्यवस्था व ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, शेतकऱ्यांना थेट हमीभावाचा लाभदेऊन त्यांचे आर्थिक नुकसान टाळावे, यासाठी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आमदार सत्तार यांनी पत्रात नमूद केले आहे. कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी बाजारपेठ. यंदा मका उत्पादन चांगले झाले परंतेभाव कोसळले. हमीभावापेक्षा कमी दरात मका विक्री करावी लागत आहे. शासनाने मागील काळात खुपच कमी दिवसांसाठी मका खरेदी केंद्र सुरु केले, मका विक्रीसाठी शेतकऱ्यांवर अनेक अटी लादल्या. अनेक शेतकऱ्यांची मका घरात, शेतात पडून आहे, त्यांची कोंडी झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis