आरोग्य सेवेत 'बीड पॅटर्न'चा राज्यस्तरीय गौरव
बीड, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित ''महाआरोग्य सन्मान २०२६'' सोहळ्यात बीड जिल्ह्याने आरोग्य क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आपली मोहोर उमटवली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री म
अ


बीड, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित 'महाआरोग्य सन्मान २०२६' सोहळ्यात बीड जिल्ह्याने आरोग्य क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आपली मोहोर उमटवली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डिकर यांच्या हस्ते जिल्ह्याला विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियान यशस्वीपणे राबवल्याबद्दल महिला नोडल अधिकारी डॉ. रेखा गायकवाड यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, प्रसूती व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया विभागात उत्कृष्ट कार्याबद्दल पाथरुड प्राथमिक आरोग्य केंद्राचा गौरव झाला, तर निम्रुड येथील आशा कार्यकर्त्या शीतल ठोंगे यांनी राज्यात सर्वाधिक कामाचा मोबदला मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांच्या कुशल नियोजनामुळे जिल्ह्याला हे यश मिळाले असून, यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande