अमरावती - सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली
अमरावती, 25 फेब्रुवारी (हिं.स.) |स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना न्यायालयाने ब्रेक लावल्यानंतर आता राज्यातील प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली आहे. यामुळे या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली आहे. राज्य सहकारी
सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली  संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला येणार वेग


अमरावती, 25 फेब्रुवारी (हिं.स.) |स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना न्यायालयाने ब्रेक लावल्यानंतर आता राज्यातील प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठली आहे. यामुळे या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशाने मध्येच स्थगित झालेल्या जिल्ह्यातील रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता पुन्हा सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.

न्यायालयीन स्थगिती असलेल्या संस्था वगळता इतर सर्व संस्थांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर थांबली होती, त्याच टप्प्यापासून तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यात ‘अ’ वर्गातील बुलडाणा बँकेसह ‘ब’ वर्गातील दोन सहकारी संस्थांच्या निवडणुकांना गती मिळणार आहे. यामध्ये धन्वंतरी रुग्णालय सहकारी संस्था व अमरावती जिल्हा सहकारी पतसंस्था यांच्या प्रलंबित निवडणुकाही पुढील टप्प्यात सुरू होणार आहेत.

दरम्यान, अ व ब वर्गातील संस्थांना सुधारित निवडणूक कार्यक्रम तयार करून प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी सादर करणे बंधनकारक राहणार आहे. अंतिम मतदारयादी जाहीर झालेल्या संस्थांनाही नियमानुसार पुढील प्रक्रिया राबवावी लागणार आहे. जिल्ह्यातील अकोला बँकेची निवडणूक यापूर्वीच न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू झाली आहे, तर यवतमाळ बँकेच्या निवडणुकीवर अद्याप न्यायालयीन स्थगिती कायम आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेला गती येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande