जळगाव - तलवारीने दहशत माजवणारा अटकेत
जळगाव, 25 फेब्रुवारी (हिं.स.)पाचोरा शहरातील जारगाव चौफुली परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. पाचोरा गुन्हे शाखेने शस्त्र अधिनियमांतर्गत केलेली या आठवड्यातील ही सलग दुसरी कारवाई
जळगाव - तलवारीने दहशत माजवणारा अटकेत


जळगाव, 25 फेब्रुवारी (हिं.स.)पाचोरा शहरातील जारगाव चौफुली परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. पाचोरा गुन्हे शाखेने शस्त्र अधिनियमांतर्गत केलेली या आठवड्यातील ही सलग दुसरी कारवाई असल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच दरम्यान, पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार पाचोरा शहरातील जारगाव चौफुली भागात एक तरुण धारदार तलवारीसह फिरत असून परिसरात दहशत माजवत आहे. मिळाल्याने या माहिती नुसार पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि संशयित आरोपी सोमनाथ वना पाटील (वय -१९) (रा. हनुमान नगर, पाचोरा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात सोमनाथ पाटील याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा गु.र.नं. ८४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या पूर्वी अंतुर्ली फाट्यावर पाचोरा पोलिसांनी कारवाई केली होती. याच आठवड्यात अशाच प्रकारची ही दुसरी यशस्वी कारवाई केली आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव कविता नेरकर, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ त्याचबरोबर पोलीस कर्मचारी संदीप राजपूत, जितेश पाटील, योगेश पाटील, हरीश परदेशी यांनी पार पाडली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande