छ.संभाजीनगर महापालिकेत स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेत्याच्या निवडीची प्रतीक्षा
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)महापालिकेत आता स्थायी समितीचे सभापती आणि सभागृह नेत्याच्या निवडीची प्रतीक्षा आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडी होतील असे मानले जात आहे. महापालिका निवडणुकीच्या एक महिन्यानंतर महापौर, उपमहापौर प
छ.संभाजीनगर महापालिकेत स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेत्याच्या निवडीची प्रतीक्षा


छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)महापालिकेत आता स्थायी समितीचे सभापती आणि सभागृह नेत्याच्या निवडीची प्रतीक्षा आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडी होतील असे मानले जात आहे. महापालिका निवडणुकीच्या एक महिन्यानंतर महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक झाली. भाजपचे समीर राजूरकर महापौर म्हणून तर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ उपमहापौर म्हणून निवडले गेले. त्यांनी कारभार सुरु केल्यावर विरोधी पक्षनेत्याची देखील नियुक्ती झाली. एमआयएमचे नगरसेवक अब्दुल समीर यांची या पदावर वर्णी लावण्यात आली.

महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता यांच्या निवड व नियुक्तीनंतर आता स्थायी समितीचे सभापती कोण होणार आणि सभागृह नेता म्हणून कोणत्या नगरसेवकाला काम करण्याची संधी दिली जाणार या बद्दल पालिकेच्या वर्तुळात उत्सुकता आहे. ही दोन्हीही पदे भाजपकडे जातील असे मानले जात आहे. स्थायी समितीच्या सोळा सदस्यांपैकी संख्या बळानुसार भाजपचे आठ नगरसेवक स्थायी समितीमध्ये असतील त्यामुळे सभापतीपद भाजपलाच मिळेल, पालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande