छ. संभाजीनगर - लासूर स्टेशन येथील सिमेंट रस्त्याचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)कृषी उत्पन्न बाजार समिती, लासूर स्टेशन येथील मुख्य बाजार आवारातील सिमेंट रस्त्याचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला मतदारसंघातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या
अ


छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)कृषी उत्पन्न बाजार समिती, लासूर स्टेशन येथील मुख्य बाजार आवारातील सिमेंट रस्त्याचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न झाला मतदारसंघातील लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या जवळ जवळ सव्वाकोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्याचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या विकासकामामुळे स्थानिक व्यापारी, शेतकरी आणि बाजारपेठेतील ये-जा करणाऱ्या शेतकरी, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी दिली.

यावेळी वैजापूर गंगापूर मतदार संघाचे आमदार रमेश बोरनारे यांच्याअध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कार्यमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विकासकामामुळे परिसरातील पायाभूत सुविधांना बळकटी मिळून बाजारपेठेचा विकास अधिक वेगाने होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande