
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील पोलीस पाटील भरतीसाठीची लेखी परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि शांततेत पार पडली. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या ११,३२५ उमेदवारांपैकी १०,८८६ उमेदवार हजर होते, तर ४३९ जणांनी दांडी मारली. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः विविध परीक्षा केंद्रांवर जाऊन पाहणी केली. संपूर्ण प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि भरारी पथकांची करडी नजर होती.
प्रशासनाकडून मिळालेल्या वेळापत्रकानुसार, लेखी परीक्षेचा निकाल २४ फेब्रुवारीला जाहीर होईल आणि २५ फेब्रुवारीला मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. पात्र उमेदवारांच्या मुलाखती २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान घेतल्या जाणार असून, २ मार्च २०२६ रोजी या भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल घोषित केला जाईल.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis