वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान -आ. मुंडे
बीड, 25 फेब्रुवारी (हिं.स.) बीड जिल्ह्यासह राज्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी जिल्ह्यात तसेच मराठवाड्यासह पूर्व विदर्भ, कोकण आदी भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बी पिकांचे तसेच भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते.

आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य शासनाचे झालेल्या नुकसानीकडे लक्ष वेधले.

अवकाळी व गारपिटीने जमीनदोस्त झालेली गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला तसेच नुकसान झालेली फळपिके या सर्वांचे तातडीने पंचनामे करून शासनास नुकसानीचे अहवाल सादर करण्याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनास निर्देश देण्याची विनंती आमदार मुंडे यांनी सभागृहात केली.

यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त सर्व जिल्ह्यात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

 rajesh pande