नांदेड - पीएम श्री योजने अंतर्गत जि. परिषद हायस्कूल विष्णुपुरी शाळेला भेट
नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। लातूर विभागात पीएम श्री योजने अंतर्गत प्रथम आलेल्या विष्णुपुरी जिल्हा परिषद शाळेस भारत सरकारचे सहसचिव डॉ. निधी पांडे व नांदेड जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांनी भेट देऊन पाहणी करून विध्यार्थी पालकांशी , सुसंवाद साध
नांदेड - पीएम श्री योजने अंतर्गत जि. परिषद हायस्कूल विष्णुपुरी शाळेला भेट


नांदेड, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। लातूर विभागात पीएम श्री योजने अंतर्गत प्रथम आलेल्या विष्णुपुरी जिल्हा परिषद शाळेस भारत सरकारचे सहसचिव डॉ. निधी पांडे व नांदेड जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांनी भेट देऊन पाहणी करून विध्यार्थी पालकांशी , सुसंवाद साधला, व भौतिक सुविधा शैक्षणिक गुणवत्ता बाबींचे निरीक्षण केले.पीएम पीएमश्री योजना ही एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण छएझ-२०२० च्या अंतर्गत सरकारी शाळांच्या दर्जा उंचवणारी केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरात १५,५०० हून अधिक सरकारी शाळांना पीएम श्री शाळेच्या दर्जा प्राप्त झालेला आहे.

या शाळा मॉडल शाळा म्हणून विकसित केल्या जात असून, डिजिटल शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, आणि सर्वांगीण विकासावर भर देऊन गुणवत्तेचे नेतृत्व करतात. महाराष्ट्रात ही या योजनेअंतर्गत अनेक शाळांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या कायापालट केला जात आहे. त्यातील नांदेड जिल्ह्यातील एक नामांकित शाळा म्हणून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजने अंतर्गत लातूर विभागात प्रथम आलेली शाळा म्हणजे पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी होय, ही शाळा पीएम श्री योजने अंतर्गत असल्या कारणाने तसेच लातूर विभागात प्रथम आलेली शाळा असल्या मुळे भारत सरकारच्या सह सचिव डॉ. निधी पांडे यांच्या मार्गदर्शनात नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले मुक्कावार उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, शिक्षण अधिकारी सौ. वंदना फुटाणे सलगर, बनसोडे, शिक्षण विभागातील अन्य अधिकाऱ्यांनी पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी या शाळेला भेट देऊन शाळेतील विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला.

भौतिक सुविधा शैक्षणिक गुणवत्ता इत्यादी बाबींचे निरीक्षण करून पीएमश्री योजने पूर्वीची आणि पीएमश्री योजनेनंतर शाळेची स्थिती जाणून घेतली. या योजनेच्या माध्यमातून शाळेच्या प्रगतीचा अहवाल पीपीटी च्या माध्यमातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला जाधव आणि शिवाजी वेदपाठक यांनी सर्व मान्यवरांनी दाखवले. शाळेतील वर्ग, भौतिक सुविधा, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आहार, इत्यादी बाबींचे निरीक्षण केले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबर्डे, गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande