व्होल्टासकडून एआय सक्षम स्प्लिट एसी सिरीज लाँच
मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। हाऊस ऑफ टाटा अंतर्गत येणाऱ्या आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्होल्टासने समर २०२६ साठी आपला नवीन एआय सक्षम स्प्लिट एअर कंडिशनर पोर्टफोलिओ बाजारात आणला आहे. ‘हर घर व्होल्टास’ या घोषव
Voltas launches AI-enabled split AC series


मुंबई, 25 फेब्रुवारी, (हिं.स.)। हाऊस ऑफ टाटा अंतर्गत येणाऱ्या आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्होल्टासने समर २०२६ साठी आपला नवीन एआय सक्षम स्प्लिट एअर कंडिशनर पोर्टफोलिओ बाजारात आणला आहे. ‘हर घर व्होल्टास’ या घोषवाक्याखाली सादर करण्यात आलेली व्हर्टिस एआय सिरीज भारतातील वैविध्यपूर्ण आणि तीव्र हवामान लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे.

या नव्या एसींमध्ये एआय अॅडप्टिव्ह कूलिंग तंत्रज्ञानाचा समावेश असून ते खोलीतील तापमान, आर्द्रता आणि वापरकर्त्यांच्या सवयींचा अभ्यास करून आपोआप कूलिंगची तीव्रता समायोजित करते. त्यामुळे सतत रिमोटने तापमान बदलण्याची गरज राहत नाही आणि प्रत्येक कुटुंब सदस्याला वैयक्तिकृत आराम मिळतो. एआय एनर्जी मॅनेजर फीचर व्होल्टास इंटेलिजन्स अॅपशी जोडलेले असून वापरकर्त्यांना मासिक वीज वापराचे लक्ष्य निश्चित करता येते. त्यानुसार एसी रिअल टाइममध्ये कार्यक्षमता बदलून वीज बचत आणि आराम यामध्ये संतुलन राखतो.

यामध्ये एआय जिओफेन्सिंगसारखे आधुनिक फीचरही देण्यात आले आहे. वापरकर्ता घरी परत येण्यापूर्वीच एसी कूलिंग सुरू करतो आणि घरात कोणी नसल्यास अनावश्यक वीज वापर टाळतो. कंपनीने या सिरीजच्या प्रचारासाठी अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांना मोहिमेत सहभागी केले आहे. जाहिरातीत आई-मुलामधील हलक्याफुलक्या प्रसंगातून घराघरातील एसी तापमानावरून होणारी चर्चा आणि त्यावर एआय तंत्रज्ञानाचे समाधान प्रभावीपणे दाखवले आहे.

व्होल्टासच्या या नव्या उपक्रमातून भारतातील प्रत्येक घरात स्मार्ट, कार्यक्षम आणि वैयक्तिकृत कूलिंग पोहोचवण्याचा कंपनीचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. भारताच्या हवामानासाठी खास तयार करण्यात आलेली ही एआय सिरीज कूलिंग क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा कंपनीचा दावा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande