छ. संभाजीनगर - 'महाराष्ट्राची लोकधारा'चा आनंद घेता येणार
छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरीय आणि मिनी सरस स्वयंसहाय्यता समूहांची विक्री व प्रदर्शन महोत्सवात महिला बचत गटांचे १५० हून अधिक स्टॉल असतील, विविध वस्तूंसह खाद्
छ. संभाजीनगर - 'महाराष्ट्राची लोकधारा'चा आनंद घेता येणार


छत्रपती संभाजीनगर, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरीय आणि मिनी सरस स्वयंसहाय्यता समूहांची विक्री व प्रदर्शन महोत्सवात महिला बचत गटांचे १५० हून अधिक स्टॉल असतील, विविध वस्तूंसह खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा यात समावेश असून प्रदर्शनास येणाऱ्या नागरिकांसाठी भीमराव पांचाळे यांची शब्द सुरांची भावयात्रा, महाराष्ट्राची लोकधारा; तसेच नृत्याचा कार्यक्रम अशी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती विकास नियोजन विभागाच्या अपर आयुक्त सुषमा देसाई, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी दिली.

२८ फेब्रुवारी या कालावधीत महोत्सवात रोज सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

२६ फेब्रुवारी रोजी गजलनवाज भीमराव पांचाळे व भाग्यश्री पांचाळे यांचा मराठी गजल गायन कार्यक्रम शब्दसुरांची भावयात्रा; तसेच शुक्रवारी प्रख्यात शास्त्रीय नृत्यांगना पार्वती दत्ता प्रस्तुत विविधा हा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम व २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या कलागुणांचे सादरीकरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात १५० स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहेत. यामध्ये इतर जिल्हयातील ६० स्टॉल आहेत व जिल्ह्यांमधील ९० स्टॉल आहेत त्यामध्ये १३८ वस्तूंचे समूह स्टॉल व ३० खाद्यपदार्थाचे समूह स्टॉल आहेत, अशी माहिती अपर आयुक्त देसाई यांनी दिली.

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ निर्माण करणे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिरसे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande