मुंबईतील डी. जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
* भारतीय संरक्षण दलांच्या शौर्याची प्रेरणा मुंबई, 25 फेब्रुवारी (हिं.स.) समाजसेवा आणि राष्ट्रवादाचा अनोखा संगम साधत विलेपार्ले (पश्चिम) येथील नामांकित ''द्वारकादास जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालया''च्या ''राष्ट्रीय सेवा योजना'' युनिटतर्फ
रक्तदान


* भारतीय संरक्षण दलांच्या शौर्याची प्रेरणा

मुंबई, 25 फेब्रुवारी (हिं.स.) समाजसेवा आणि राष्ट्रवादाचा अनोखा संगम साधत विलेपार्ले (पश्चिम) येथील नामांकित 'द्वारकादास जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालया'च्या 'राष्ट्रीय सेवा योजना' युनिटतर्फे गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी वार्षिक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुपर रुग्णालयाच्या अगदी समोर असलेल्या महाविद्यालयीन परिसरात हे शिबिर पार पडणार आहे.

यंदाच्या रक्तदान मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची संकल्पना 'भारतीय संरक्षण दल 'यांवर आधारित आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे धैर्य, त्याग आणि सेवावृत्तीचा सन्मान करण्यासाठी ही विशेष थीम निवडण्यात आली आहे. आपल्या जवानांप्रमाणेच सामान्य नागरिकांनीही रक्तदान करून देशसेवेत आपला खारीचा वाटा उचलावा, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.

या उपक्रमाबद्दल माहिती देताना डी. जे. संघवी एनएसएसच्या प्रतिनिधीने सांगितले की, रक्तदान ही केवळ मदत नसून ते एक जीवनदान आहे. एक युनिट रक्ताने अनेक प्राण वाचू शकतात. या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि करुणेची भावना निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. सामाजिक जबाबदारीचे भान राखत डी. जे. संघवी महाविद्यालय आपल्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि सेवाभाव जोपासण्यासाठी अशा विविध उपक्रमांतून नेहमीच अग्रेसर राहिले आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेषतः स्थानिक नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande