
मुंबई, 25 फेब्रुवारी (हिं.स.)। संस्कृती, सर्जनशीलता आणि व्यापकतेवर आधारित भविष्योन्मुख कॉन्टेन्ट इकोसिस्टम उभारण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देत *‘Z’* तर्फे *झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट* – या आपल्या प्रकारच्या अशा पहिल्याच, उद्योगांची व्याख्या करणाऱ्या संपूर्ण भारतभर राबवल्या जाणाऱ्या ओम्नीचॅनेल उपक्रमाच्या शुभारंभाची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील नवोदित चित्रपट निर्मिती प्रतिभेचा शोध घेऊन त्यांचे संगोपन करणे आणि त्यांची कला साजरी करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
https://www.youtube.com/watch?v=LRmsUjtiKbM
देशातील विविध क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेले फिल्ममेकर्स एकाच राष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र आणत, ही स्पर्धा भारतीय मनोरंजन क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाकांक्षी बहुभाषिक कलागुण शोध उपक्रमांपैकी एक ठरत आहे. खरोखरच सर्वसमावेशक दृष्टीकोनातून राबवलेल्या या उपक्रमात *हिंदी* , *मराठी* , *बंगाली* , *तेलुगू,* *तामिळ* , *मल्याळम* आणि *कन्नड* अशा सात प्रमुख भाषांचा समावेश असून विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि चित्रपट परंपरांतील कथाकथनकारांना ह्या उद्योगातील दिग्गजांच्या पाठबळासह राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
*झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट* च्या केंद्रस्थानी विविध चित्रपट उद्योगांतील कथाकथनाला नवी दिशा देणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकांचे प्रभावी परीक्षक पॅनल आहे. या परीक्षकांमध्ये हिंदीतील *‘गँग्स ऑफ वासेपूर’* सारख्या धाडसी आणि वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे *अनुराग कश्यप (हिंदी)* ; मराठीतील *‘नटरंग’* सारख्या सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले *रवि जाधव (मराठी)* ; बंगालीतील *‘ऑटोग्राफ’* आणि *‘जातिश्वर’* सारख्या आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शक *सृजित मुखर्जी (बंगाली)* ; तेलुगूतील *‘कल्की 2898 एडी’* सारख्या भव्य चित्रपटामागील द्रष्टे दिग्दर्शक *नाग अश्विन (तेलुगू)* ; सामाजिक विषयांवर आधारित परिणामकारक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक *समुथिरकणी (तामिळ)* ; *‘जल्लिकट्टू’* सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या, दृश्यदृष्ट्या धाडसी चित्रपटांचे दिग्दर्शक *लिजो जोस पेलिसेरी (मल्याळम)* ; तसेच *‘गोधी बन्ना साधारण मायकट्टू’* सारख्या भावनिक आणि सूक्ष्म कथाकथनासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक *हेमंत राव (कन्नड)* यांचा समावेश आहे.
प्रथमच आपापल्या प्रादेशिक चित्रपट चळवळीचे नेतृत्व करणारे आणि स्वतंत्र कथाकथन शैली घडवणारे दिग्गज दिग्दर्शक एका व्यासपीठावर एकत्र आले असून नवोदित प्रतिभेला मार्गदर्शन व संधी देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. त्यांच्या सहभागामुळे या स्पर्धेला भक्कम विश्वासार्हता लाभतेच आणि त्याचसोबत भारतातील खऱ्या भाषिक व सर्जनशील विविधता प्रतिबिंबित करणारा, संस्कृतीशी जोडलेला आणि भविष्यासाठी सज्ज असा टॅलेंट इन्क्युबेटर उभारण्याचा ‘Z’चा धोरणात्मक हेतूही स्पष्ट होतो.
या देशव्यापी कलागुण शोध उपक्रमाच्या माध्यमातून *‘Z’* तरुण, महत्त्वाकांक्षी आणि उत्कट फिल्ममेकर्सना आधुनिक भारतीय चित्रपटसृष्टी घडवणाऱ्या दिग्गज कथाकथनकारांसमोर आपली कला सादर करण्यासाठी सर्वसमावेशक संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश ठेवत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या फिल्ममेकर्सना व्यावसायिक चित्रपटसृष्टीत ओळख मिळवण्याची संधी मिळणार असून त्यांच्या सर्जनशील प्रवासाला पाठबळ देणारी रोख बक्षिसेही जिंकता येणार आहेत. तसेच *‘Z’* च्या व्यापक कॉन्टेन्ट इकोसिस्टममधील विविध सहकार्याच्या संधीही त्यांच्यासाठी खुल्या होणार आहेत. आजच्या डिजिटल युगात विविध माध्यमांवर कथा सहजपणे पोहोचत असताना हा उपक्रम निर्मात्यांना केवळ एका फॉरमॅटपुरते मर्यादित न राहता विचार करण्यास प्रोत्साहित करतो. डिजिटल, टेलिव्हिजन आणि चित्रपटगृह अशा तिन्ही माध्यमांवर सहजपणे सादर करता येतील अशा प्रभावी कथा घडवण्यावर या उपक्रमाचा भर आहे.
या उपक्रमामागील दृष्टीकोन स्पष्ट करताना *झी आणि झी5चे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक महादेव* यांनी सांगितले, “भारतामध्ये जगातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण कथाकथन परंपरा असली तरी नवोदित फिल्ममेकर्सना संधी आणि ओळख मिळणे अनेकदा विखुरलेले आणि अस्पष्ट राहिले आहे. झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्टच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय पातळीवर अशा संधींना संस्थात्मक रूप देत आहोत. सात भाषांतील मार्गदर्शक आणि वेगळ्या वाटा घेणाऱ्या दिग्गज फिल्ममेकर्सना एका व्यासपीठावर एकत्र आणून आम्ही प्रादेशिक उत्कृष्टतेला राष्ट्रीय ओळख मिळवून देणारी इकोसिस्टम घडवत आहोत. ही केवळ एक स्पर्धा नसून भारताच्या सर्जनशील प्रवाहाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे भविष्य घडवणाऱ्या नव्या पिढीतील कथाकथनकारांना घडवण्यासाठी उचललेले हे एक धोरणात्मक पाऊल आहे.”
नवोदित फिल्ममेकर्सना प्रोत्साहन देत अनुराग कश्यप म्हणाले, “एका शॉर्ट फिल्ममुळेच मला माझे पहिले फिचर मिळाले होते. फिल्ममेकर होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची तुमची हीच संधी आहे.” सृजित मुखर्जी पुढे म्हणाले, “चित्रपट निर्मिती ही नेहमीच मनाशी जोडलेली प्रक्रिया असते. आपल्या हृदयाचे ऐका आणि अडथळ्यांतून मार्ग काढण्याचे काम तुमचे मन आपोआप करेल.” लिजो जोस पेलिसेरी म्हणाले, “जर तुम्हांला स्वतःवर विश्वास असेल की तुम्ही फिल्ममेकर आहात, तर दार खुले आहे. या, एक शॉर्ट फिल्म बनवा आणि मोठी झेप घ्या.” नाग अश्विन म्हणाले, “चित्रपटसृष्टी ही केवळ स्वप्नांची दुनिया नाही, तर ती कथांची दुनिया आहे. तुमचे कौशल्य जगासमोर मांडून दाखवा.” हेमंत राव म्हणाले, “सिनेमावरचे प्रेम हा असा आजार आहे जो कधीच बरा होत नाही. तुमच्या मनात एखादी कथा सतत घोळत आहे का? ती सगळ्यांसोबत शेअर करा. झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्टसाठी नोंदणी करा आणि तुमची शॉर्ट फिल्म सादर करा.” *रवि जाधव यांनी प्रतिक्रिया दिली* , “फिल्म मेकिंगमध्ये प्रतिभा, आवड आणि दृष्टीकोन यांनाच सर्वाधिक महत्त्व असते. ही गुणवैशिष्ट्ये तुमच्यात असतील, तर ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे.” समुथिरकणी पुढे म्हणाले, “तुमची शॉर्ट फिल्म पाठवा आणि देशातील नामवंत दिग्दर्शकांसमोर तुमचे कौशल्य सादर करण्याची ही सुवर्णसंधी मिळवा. आम्ही तयार आहोत. तुम्ही तयार आहात का?”
संस्कृतीसोबत नाळ जोडलेल्या, व्यापकता, विश्वासार्हता आणि नवोन्मेष यांच्या बळावर कथाकथनाला प्रोत्साहन देत ‘Z’ आपली वाटचाल सुरू ठेवत असून झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट हा एक मैलाचा दगड ठरणारा उपक्रम ठरतो. हा उपक्रम केवळ नव्या आवाजांचा शोध घेत नाही, तर भारतीय मनोरंजनाच्या भविष्यातील चित्रपटकारांची पुढील पिढी घडवण्यास मदत करणारा एक सुस्पष्ट आणि संरचित मार्गही उपलब्ध करून देतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर