
रायगड: रसायनी पोलिसांकडून अफू पावडरसदृश्य पदार्थ जप्त, दोन आरोपी अटक
रायगड, 26 फेब्रुवारी 2026 (हिं.स.) – रसायनी पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत पोलिसांनी अफू पावडरसदृश्य पदार्थ जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे.
मौजे कैरे गावाच्या हद्दीत, सावरोली-पाताळगंगा रोड वर, बॉम्बे डाइंग कंपनी समोर, खालापूर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये लपवून ठेवलेली अफू पावडरसदृश्य अंमली पदार्थाची साठवण आढळून आली.
या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे रा. कौलघर, ता. बलाचोर, जि. नवाशेर (पंजाब) येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींना २५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ३:२१ वाजता अटक करण्यात आली.
सदर घटनेप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०/२०२६ अन्वये एनडीपीएस अधिनियम 1985 चे कलम ८(क), १८ व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर करीत आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके