परभणी - जनावरे चोरी प्रकरणातील आरोपी जाळ्यात; २१ हजारांचा बोकड जप्त
परभणी, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। मानवत पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या शेळी व बैल चोरी प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुरनं ७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा नोंद कर
जनावरे चोरी प्रकरणातील आरोपी स्थानिक गुन्हा शाखेच्या जाळ्यात; २१ हजारांचा बोकड जप्त


परभणी, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।

मानवत पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या शेळी व बैल चोरी प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी गुरनं ७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. मंगळवारी (दि. २४) स्थानिक गुन्हा शाखेचे विवेकानंद पाटील, रंगनाथ दुधाटे, चंदनसिंह परीहार, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, सचिन भदर्गे व गजानन क्षीरसागर यांचे पथक शहरात गस्तीवर असताना साखला प्लॉट परिसरातील राहुलसिंग दारासिंग दुधानी याने मानवत तालुक्यातील मंगरुळ येथून एक शेळी व एक बोकड चोरी करून आणल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पथकाने साखला प्लॉट येथील आरोपीच्या घरी छापा टाकला असता तो घरी आढळून आला. घरासमोर बांधलेला बोकडही जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपीने साथीदार कालासिंग गुरुबच्चनसिंग दुधानी यांच्या मदतीने दुचाकीवरून जनावरे चोरी केल्याची कबुली दिली.

कारवाईदरम्यान २१ हजार रुपये किमतीचा बोकड जप्त करण्यात आला असून आरोपीस पुढील तपासासाठी मानवत पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande