
लातूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.) – आष्टा गावाजवळील भंडारी फॉर्म जवळ संध्याकाळी सुमारे सहाच्या दरम्यान झालेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
यात छोटा हत्ती आटो (एमएच-55 सी 0336) आणि मोटारसायकल (एमएच-14 एके 1398) यांच्यात धडक झाली. अपघातात सचिन संग्राम शेटे, रा. नळेगाव हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.सचिन शेटे यांचे अंत्यविधी नळेगाव येथील लिंगायत स्मशानभूमीत पार पाडण्यात आले. ते लातूर येथील एका खाजगी फायनान्समध्ये काम करत होते. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.नळेगाव पोलिस दुरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis