
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी, (हिं.स.) : एअरटेल पेमेंट्स बँकेने आज आपल्या एनसीएमसी एनेबल्ड रुपे ऑन-द-गो कार्डांसाठीच्या तत्काळ एनएफसी-बेस्ड बॅलन्स अपडेट सुविधेची घोषणा केली. ग्राहक आता त्यांच्या एनएफसी-पॉवर्ड अँड्रॉइड स्मार्टफोन्सवरील कार्ड सहजपणे टॅप करून तत्काळ कार्डावरील उर्वरित रक्कम तपासू शकतील किंवा ती अद्ययावत करू शकतील. त्यामुळे मेट्रो स्थानकावरील किऑस्कमध्ये जाण्याची गरज भासणार नाही आणि विनासायास, पूर्णपणे डिजिटल व संपर्करहित प्रवासाचा अनुभव मिळेल.
वास्तव जगातील वापराची माहिती तसेच ग्राहकांच्या प्रतिक्रिया जमवण्यासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेने काही महिन्यांपूर्वी ही सुविधा प्रयोग म्हणून सादर केली होती. प्रायोगिक स्तरावर या सुविधेला चांगली स्वीकृती आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला, त्यामुळे या सुविधेची दैनंदिन प्रवाशांसाठी असणारी उपयुक्तता सिद्ध झाली. या सकारात्मक प्रतिसादामुळे बँक आता ही सुविधा रुपे ऑन-द-गो कार्डाच्या सर्व वापरकर्त्यांसाठी सुरू करत आहे.
या सुविधेत सुधारणा झाल्यामुळे प्रवासी आता त्यांच्या बँकखात्यामध्ये किंवा एअरटेल थँक्स अॅपवरील वॉलेटमध्ये लॉगइन करून लिंक्ड एनएफसी-एनेबल्ड अँड्रॉइड स्मार्टफोनद्वारे तत्काळ (रिअल टाइम) कार्ड बॅलन्स तपासू शकतात किंवा ते अद्ययावत करू शकतात (त्यात रक्कम भरू शकतात). कार्ड ऑर्डर व रिचार्ज करण्यापासून ते तत्काळ बॅलन्स तपासणे व तो अद्ययावत करण्यापर्यंतचा संपूर्ण अनुभव आता पूर्णपणे डिजिटल होऊ शकेल, रांगेत उभे राहण्याची गरजच भासणार नाही, प्रवास विनासायास होईल.
एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बिझनेस ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक श्री. गणेश अनंतनारायणन म्हणाले, “दैनंदिन व्यवहार ग्राहकांसाठी अधिक सुलभ व अंत:प्रेरणाधारित (इंट्युइटिव) करण्याचे नावीन्यपूर्ण मार्ग शोधण्यावर एअर पेमेंट्स बँक सातत्याने भर देते. बॅलन्स तत्काळ, कुठूनही अपडेट करण्याची गरज प्रायोगिक स्तरावर मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे सिद्ध झाली. याबरोबरच प्रवास अधिक सोयीस्कर करणाऱ्या तसेच भारताची डिजिटल पेमेंट्स व प्रवास परिसंस्था भक्कम करणाऱ्या उद्योगक्षेत्रातील आणखी एका सुविधेची पायाभरणी पुन्हा एकदा केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
एअरटेल पेमेंट्स बँक ही रुपे ऑन-द-गो कार्डांची आघाडीची जारीकर्ता बँक आहे, बँकेने आजवर ५० लाख कार्ड्स जारी केले आहेत. आता सुरू केलेली सुविधाही भारताच्या प्रवास क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा समजली जात आहे. ग्राहकांच्या अनुभवात सुधारणा घडवून आणणारी अत्याधुनिक वित्तीय व प्रवासी साधने विकसित करण्याप्रती बँकेची वचनबद्धता यामुळे अधोरेखित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर