ॲक्सिस बँकेचे अड्डा एज्युकेशनशी सहकार्य
मुंबई, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। खासगी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक, ॲक्सिस बँकेने अड्डा एज्युकेशनच्या सहकार्याने, त्यांच्या कमर्शियल बँकिंग ग्रुपसाठी (CBG) रिलेशनशिप मॅनेजरचे (RMs) एक विशिष्ट कॅडर तयार करण्यासाठी नियोजनबद्ध हायर-
मुंबई


मुंबई, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। खासगी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक, ॲक्सिस बँकेने अड्डा एज्युकेशनच्या सहकार्याने, त्यांच्या कमर्शियल बँकिंग ग्रुपसाठी (CBG) रिलेशनशिप मॅनेजरचे (RMs) एक विशिष्ट कॅडर तयार करण्यासाठी नियोजनबद्ध हायर-ट्रेन-डिप्लॉय (HTD) उपक्रम सुरू केला आहे. बँकेच्या झपाट्याने वाढणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योग (SME) फ्रँचायझीला बळकट करण्यावर या उपक्रमाचा भर आहे. हा उपक्रम बँकेच्या प्रमुख धोरणात्मक प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे.

पारंपरिक उद्योग मॉडेल्सपेक्षा वेगळ्या पद्धतीने कौशल्ये निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम डिझाइन केला आहे, जो आरएमना एसएमई क्लायंटच्या छोट्यात छोट्या गरजांनुसार सुसज्ज करतो. 2026च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कौशल्य आणि सेवा-क्षेत्रातील रोजगारावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. त्यामुळे आता सुरू करण्यात आलेले एचटीडी मॉडेल हे नवीन आरएम पहिल्या दिवसापासून वापरासाठी योग्य आणि प्रभावी आहेत, हे निश्चित करते. नियोजनबद्ध, प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे भरती आणि वास्तविक-जगातील तयारीमधील अंतर भरून काढतात.

एचटीडी कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत:

· व्यावसायिक बँकिंग आरएम गरजांनुसार को-क्युरेटेड, विशिष्ट अभ्यासक्रम

· प्रत्यक्ष जीवनातील सिम्युलेशन आणि ग्राहक सहभागाद्वारे सरावावर आधारित शिक्षण

· उत्पादने, प्रक्रिया आणि नियमकांशी रचनात्मक संपर्क

· अ‍ॅक्सिस बँकेच्या सीबीजी भूमिकांशी स्पष्ट सुसंगतीसह थेट प्रशिक्षण

या उपक्रमाबद्दल अ‍ॅक्सिस बँकेचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि ह्युमन रिसोर्सेस प्रमुख राजकमल वेम्पती म्हणाले, भारताच्या विकासात सेवा क्षेत्राची भूमिका वाढत असल्याने, नोकरीसाठी तयार, भविष्याच्या दृष्टीने योग्य प्रतिभेची गरज यापूर्वी कधीही एवढी नव्हती, विशेषतः एसएमई सारख्या सर्वाधिक मागणी असलेल्या विभागात. हायर-ट्रेन-डिप्लॉय प्रोग्राम आम्हाला आमच्या व्यावसायिक बँकिंगशी विकसित होत असलेल्या गरजांशी जुळवून घेत उच्च-गुणवत्तेची, तत्काळ वापरण्यासाठी योग्य अशा प्रतिभेला वाव देण्यास मदत करतो, त्याचबरोबर आमच्या लोकांसाठी अर्थपूर्ण करिअरची निवड सक्षम करतो.

अड्डा एज्युकेशनच्या स्किलिंग अँड हायर एज्युकेशनचे सीईओ श्री. बिमलजीत भसीन म्हणाले, “सीबीजी रिलेशनशिप मॅनेजर प्रोग्रामची सुरुवात अ‍ॅक्सिस बँकेच्या करिअर247 वर असलेल्या सातत्यपूर्ण विश्वासाचे प्रतिबिंब आहे. यामुळे क्लिष्ट, ग्राहकोपयोगी भूमिकांसाठी उत्तम प्रतिभा तयार होईल. हे सहकार्य व्यावसायिक बँकिंगमधील आमच्या भागीदारीचा नैसर्गिक विस्तार आहे. जे वास्तविक जगातील व्यावसायिक आव्हानांसाठी तयार असलेले आणि बँकेच्या ग्राहक-केंद्रित वाढीच्या धोरणाशी सुसंगत असे रिलेशनशिप मॅनेजर विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते.”

एसएमई बँकिंगमध्ये भिन्न आरएम क्षमता निर्माण करून व्यावसायिक वाढ आणि राष्ट्रीय कौशल्य अजेंडा या दोन्हींना समर्थन देणारी तसेच भविष्यासाठी तयार कौशल्य परिसंस्था तयार करून अ‍ॅक्सिस बँक या उपक्रमाद्वारे आपले कौशल्य अधिक बळकट करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande