खोपोलीत दुचाकीला कारची धडक; दोघे गंभीर जखमी
रायगड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत मौजे काटरंग आदिवासीवाडी, जुना मुंबई-पुणे रोड, ता. खालापूर येथे अपघाताची घटना घडली. फिर्यादी हे रा. अडोशी (ता. खालापूर) येथील असून ते त्यांच्या प्लसर मोटारसायकल (क्र. MH 46 CJ 3952) वर मागी
Car hits two-wheeler in Khopoli; two seriously injured


रायगड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत मौजे काटरंग आदिवासीवाडी, जुना मुंबई-पुणे रोड, ता. खालापूर येथे अपघाताची घटना घडली. फिर्यादी हे रा. अडोशी (ता. खालापूर) येथील असून ते त्यांच्या प्लसर मोटारसायकल (क्र. MH 46 CJ 3952) वर मागील सीटवर साक्षीदारास बसवून खोपोली शिळफाटा दिशेने जात होते. दरम्यान, आरोपी रा. वसई-नालासोपारा, जि. पालघर हा त्याच्या ताब्यातील स्वीफ्ट डिझायर कार (क्र. MH 58 B 0492) चालवत येऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अविचाराने व हयगयीने धोकादायकरीत्या वाहन चालवून मोटारसायकलला मागील बाजूने धडक दिली.

या अपघातात फिर्यादी व साक्षीदार या दोघांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून शरीरावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी खोपोली पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 66/2026 अन्वये मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281, 125(a), 125(b) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह/चव्हाण करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande