जागतिक बाजारातून कमजोरीचे संकेत; आशियाई बाजारात विक्रीचा दबाव
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। जागतिक बाजारातून आज कमजोरीचे संकेत मिळत असून त्याचा परिणाम आशियाई बाजारांवरही दिसून येत आहे. अमेरिकन बाजार मागील सत्रात घसरणीसह बंद झाले. तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये, विशेषतः एनव्हीडियाच्या शेअर्समध्ये ५.५
Global Market Trends


नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। जागतिक बाजारातून आज कमजोरीचे संकेत मिळत असून त्याचा परिणाम आशियाई बाजारांवरही दिसून येत आहे. अमेरिकन बाजार मागील सत्रात घसरणीसह बंद झाले. तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये, विशेषतः एनव्हीडियाच्या शेअर्समध्ये ५.५० टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याने बाजारावर दबाव निर्माण झाला. परिणामी एस अँड पी 500 निर्देशांक ०.५४ टक्के घसरून ६,९०८.८६ अंकांवर बंद झाला, तर नॅस्डॅक १.२१ टक्क्यांच्या घसरणीसह २२,८७२.३५ अंकांवर स्थिरावला. तथापि डाउ जोन्स फ्युचर्स मध्ये आज किरकोळ ०.०३ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे सध्या ४९,४९९.२० अंकांवर व्यापार करत आहे.

अमेरिकन बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवरही युरोपीय बाजारात सकारात्मक वातावरण राहिले. एफटीएसई ०.३७ टक्क्यांच्या वाढीसह १०,८४६.७० अंकांवर बंद झाला. फ्रान्सचा सीएसी ०.७२ टक्क्यांनी वधारून ८,६२०.९३ अंकांवर पोहोचला, तर जर्मनीचा डीएएक्स ०.४५ टक्क्यांच्या वाढीसह २५,२८९.०२ अंकांवर बंद झाला.

मात्र आशियाई बाजारात आज मिश्र पण प्रामुख्याने नकारात्मक कल दिसून येत आहे. जपानचा निक्केई निर्देशांक 225 ०.२९ टक्क्यांच्या वाढीसह ५८,७५३.३९ अंकांवर व्यवहार करत आहे, तर सिंगापूरचा स्ट्रेट्स टाइम्स निर्देशांक ०.२७ टक्क्यांनी मजबूत झाला आहे. दुसरीकडे गिफ्ट निफ्टी ०.६१ टक्के घसरून २५,५०८.५० अंकांवर आला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक ०.५३ टक्के घसरला असून हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.४६ टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार करत आहे. तसेच शांघाय कंपोझिट निर्देशांक आणि सेट कंपोजिट निर्देशांकात यामध्येही किरकोळ घसरण नोंदवली जात आहे. जागतिक स्तरावरील या अस्थिरतेचा परिणाम पुढील सत्रांमध्ये भारतीय बाजारावरही दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande