जळगावात गोडाऊनमधून ५७ सिलिंडर्सची चोरी
जळगाव, 27 फेब्रुवारी (हिं.स.) जिल्ह्यात वरणगाव येथील बोहर्डी शिवारातील लाल माती भागात एका गॅस कंपनीच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५७ सिलिंडर्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुमारे ७२ हजार ८४६ रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला
जळगावात गोडाऊनमधून ५७ सिलिंडर्सची चोरी


जळगाव, 27 फेब्रुवारी (हिं.स.) जिल्ह्यात वरणगाव येथील बोहर्डी शिवारातील लाल माती भागात एका गॅस कंपनीच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५७ सिलिंडर्स चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सुमारे ७२ हजार ८४६ रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला असून याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.माहितीनुसार, चोरट्याने गोडाऊनमध्ये प्रवेश करून प्रत्येकी १ हजार २७८ रुपये किमतीचे ५७ सिलिंडर्स उचलून नेले. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी अंदाज व्यक्त केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गॅसचे संचालक नरेंद्र उत्तमराव अहिरे (वय ५१) यांनी वरणगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.चोरीस गेलेल्या ५७ सिलिंडर्स एकूण किंमत ७२ हजार ८४६ रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गोडाऊनमधून इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर्स चोरीला गेल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. यासीन पिंजारी करीत आहेत.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच संशयितांची चौकशी सुरू करण्यात आली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande