नवीन रेनो डस्टर 17 मार्चला होणार लॉन्च
मुंबई, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। रेनॉल्ट इंडिया आपली लोकप्रिय एसयूव्ही ‘डस्टर’ पुन्हा भारतीय बाजारात आणत असून 17 मार्च रोजी तिचे अधिकृत लॉन्च होणार आहे. 2012 मध्ये प्रथम दाखल झालेल्या आणि 2022 मध्ये बंद झालेल्या या एसयूव्हीने तब्बल तीन वर्षांनंतर पुन
New Renault Duster launched on March 17


New Renault Duster launched on March 17


मुंबई, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। रेनॉल्ट इंडिया आपली लोकप्रिय एसयूव्ही ‘डस्टर’ पुन्हा भारतीय बाजारात आणत असून 17 मार्च रोजी तिचे अधिकृत लॉन्च होणार आहे. 2012 मध्ये प्रथम दाखल झालेल्या आणि 2022 मध्ये बंद झालेल्या या एसयूव्हीने तब्बल तीन वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. 27 जानेवारी रोजी नव्या डिझाइनसह सादर झालेली ही डस्टर अधिक मस्कुलर लूक, आधुनिक फीचर्स आणि हायब्रिड तंत्रज्ञानासह येत आहे. सुमारे 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीपासून तिची सुरुवात होण्याची शक्यता असून 21,000 रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग सुरू झाली आहे. टर्बो-पेट्रोल व्हेरिएंटची डिलिव्हरी एप्रिलपासून, तर स्ट्रॉंग हायब्रिड व्हर्जन दिवाळीच्या सुमारास उपलब्ध होणार आहे.

नवीन डस्टर CMF-B प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. चौकोनी LED हेडलॅम्प्स, ‘DUSTER’ ब्रँडिंग असलेली ग्रिल, सिल्व्हर स्किड प्लेट्स आणि 18 इंचांचे अलॉय व्हील्समुळे तिचा रोड प्रेझेन्स अधिक दमदार दिसतो. 4340 मिमी लांबीसह ही एसयूव्ही 5 आणि 7 सीट पर्यायात येणार आहे. आतमध्ये डबल-लेयर डॅशबोर्ड, 10.25 इंचाची गूगल OS आधारित टचस्क्रीन, 7 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरमिक सनरूफ, 700 लिटर बूट स्पेस आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि आर्कमिस 3D साउंड सिस्टमही उपलब्ध असेल.

सुरक्षिततेच्या दृष्टीने 6 एअरबॅग्स, 31 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आणि 17 ADAS फीचर्स देण्यात आले आहेत. परफॉर्मन्ससाठी 1.3 लिटर टर्बो पेट्रोल, 1 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.8 लिटर स्ट्रॉंग हायब्रिड असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. हायब्रिड व्हर्जन 160hp आउटपुटसह येईल. भारतीय बाजारात ही एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरr यांना कडवी टक्कर देणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande