पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष; चीनकडून दोन्ही देशांना शांततेचे आवाहन
बीजिंग , 27 फेब्रुवारी (हिं.स.)।चीनने शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या लष्करी तणावाबद्दल चीनने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यामाओ
पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष; चीनकडून दोन्ही देशांना  शांतता राखण्याचे आवाहन


बीजिंग , 27 फेब्रुवारी (हिं.स.)।चीनने शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या लष्करी तणावाबद्दल चीनने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यामाओ निंग यांनी माध्यमांना दिलेल्या निवेदनात सांगितले की चीन या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

माओ निंग म्हणाल्या की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे एकमेकांचे जवळचे शेजारी देश आहेत. तसेच हे दोन्ही देश चीनचेही शेजारी आणि चांगले मित्र आहेत. या संघर्षामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल चीनला अत्यंत दुःख वाटत आहे. त्यांनी स्पष्ट केले की चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देतो. दोन्ही पक्षांनी शांतता आणि संयम राखावा तसेच परस्पर संवादातून मतभेद सोडवावेत, असे त्यांनी आवाहन केले. परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी लवकरात लवकर युद्धविराम लागू करावा, अशी चीनची मागणी आहे.

चीनी प्रवक्त्यांच्या मते, तणाव कमी करणे हे दोन्ही देशांच्या आणि त्यांच्या नागरिकांच्या हिताचे आहे. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात शांतता आणि स्थैर्य टिकून राहील. माओ निंग यांनी असेही सांगितले की चीन आपल्या पातळीवर दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी आणि परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी चीन सकारात्मक भूमिका बजावण्यास तयार आहे. चीन आपल्या नागरिकांना आणि कंपन्यांना त्या भागातून बाहेर काढण्याचा किंवा उड्डाणे स्थगित करण्याचा विचार करत आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की चीन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आपल्या नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत देईल.

चीन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसोबत विशेष त्रिपक्षीय यंत्रणेद्वारे संपर्क राखतो. दोन्ही देशांतील मतभेद दूर करण्यासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या जातात. पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलूच लिबरेशन आर्मी यांसारख्या संघटनांकडून केला जात आहे. मात्र अफगाण तालिबानने हे आरोप फेटाळले आहेत. अफगाणिस्तानचा दावा आहे की पाकिस्तानी सैन्याच्या हवाई कारवाया आणि आक्रमक भूमिकेमुळे संघर्ष वाढत आहे. हे वाद मिटवून प्रदेशात शांतता प्रस्थापित करताना आपला प्रभाव कायम ठेवण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande