अमरावती : फ्रेजरपुरा हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा; ९ जण ताब्यात
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.) | शहर गुन्हे शाखेच्या पथकाने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार पंकज ठाकरे हा फरार झाला आहे. या कारवाईत एकूण ५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद
फ्रेजरपुरा हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा; ९ जण ताब्यात, मुख्य सूत्रधार फरार मंगलधाम परिसरात चालायचा जुगार


अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.) | शहर गुन्हे शाखेच्या पथकाने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधार पंकज ठाकरे हा फरार झाला आहे. या कारवाईत एकूण ५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीनुसार, न्यू कॉलनी, मंगलधाम परिसरातील राहत्या घरी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. छाप्यात आरोपींकडून ५८ हजार ५०० रुपये रोख रक्कम, ७ मोबाईल (अंदाजे किंमत १ लाख १५ हजार रुपये), ६ मोटारसायकली (अंदाजे किंमत ४ लाख २० हजार रुपये) व ताश पत्ते (२०० रुपये) असा एकूण ५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

भूषण बबनराव हिरुडकर (वय ५७, रा. न्यू कॉलनी, मंगलधाम, अमरावती); निलेश बाळासाहेब गाडे (वय ४०, रा. पुंडलिक बाबा नगर, अमरावती); गौरव शिवाजीराव ठाकूर (वय २७, रा. आदिवासी होस्टेलजवळ, पार्वती नगर, अमरावती); राहुल अरुण भाखडे (वय ३५, रा. बुधवारा, अमरावती); अनिकेत शरद राव खांडेकर (वय ३१, रा. हनुमान नगर, खोलापुरी गेट, अमरावती); अल्केश विष्णू अवझाडे (वय २६, रा. रवी नगर, अमरावती); अभिजीत सुरेशराव गावंडे (वय ३५, रा. खोलापुरी गेट, अमरावती); विजय रंगराव तायडे (वय ३८, रा. आशियाड कॉलनी, शेगाव रोड, अमरावती); निलेश बाबाराव जुनघरे (वय ४४, रा. हर्षराज कॉलनी, अमरावती)तर पंकज ठाकरे (रा. रवी नगर, अमरावती) हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande