उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक-कोटक लाईफची धोरणात्मक भागीदारी
- जीवन विम्याचा करणार प्रसार मुंबई, २७ फेब्रुवारी (हिं.स.) : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने (उत्कर्ष एसएफबीएल) कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (कोटक लाईफ) सोबत धोरणात्मक भागीदारीची महत्वपुर्ण घोषणा केली आहे. बँकेच्या विविध वित्तीय
भागीदारी


भागीदारी


- जीवन विम्याचा करणार प्रसार

मुंबई, २७ फेब्रुवारी (हिं.स.) : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने (उत्कर्ष एसएफबीएल) कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (कोटक लाईफ) सोबत धोरणात्मक भागीदारीची महत्वपुर्ण घोषणा केली आहे. बँकेच्या विविध वित्तीय योजनांच्या विस्तार धोरणांतर्गत हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. या सहकार्यामुळे उत्कर्ष बँकेचा जीवन विमा विभाग अधिक बळकट होणार आहे. या भागीदारींतर्गत, २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील बँकेच्या ११०५ बँकिंग शाखांव्दारे कोटक लाईफच्या सर्वसमावेशक विमा योजना बँकेच्या ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या ५१.४ लाख ग्राहकांना या भागीदारीचा लाभ मिळणार आहे. कोटक लाईफच्या विविध जीवन विमा योजना आणि वित्तीय पर्याय या भागीदारीमुळे अधिकाधिक ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. विशेषत: सुरक्षा, बचत, युनिट-लिंक्ड आणि निवृत्ती वेतन आदी जीवन विमा योजना बँक ग्राहकांना सहज उपलब्ध होतील.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. गोविंद सिंग या भागीदारीबद्दल बोलताना म्हणाले, आमच्या ग्राहकांना सर्वांगीण आर्थिक पर्याय प्रदान करण्याबाबतची आमची वचनबद्धता या भागीदारीतून प्रकट होते. कोटक लाईफ इन्शुरन्ससोबतच्या सहकार्यातून आम्ही अतिशय सक्षम व्यासपीठ साकारले असून त्याच्या माध्यमातून आघाडीच्या विमा कंपन्यांच्या जीवन विमा योजनांची विस्तृत श्रेणी ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जाईल. यामुळे आमच्या ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक गरजा, पसंती आणि आयुष्यातील टप्प्यांनुसार सर्वोत्तम विमा पर्याय निवडणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या विशिष्ट गरजा आणि आर्थिक उद्दिष्टांनुरूप आर्थिक सुरक्षिततेचा आधारही त्यांना मिळेल.

कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक महेश बालसुब्रमण्यम याप्रसंगी म्हणाले, प्रत्येक भारतीयासाठी जीवन विमा ही एक प्रमुख गरज आहे, ही कोटक लाईफची ठाम धारणा आहे. आयआरडीएआयच्या 'सर्वांसाठी विमा' या ध्येयाप्रती आम्ही वचनबद्ध आहोत आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेसोबतचे आमचे सहकार्य हे त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. या भागीदारीच्या माध्यमातून बँकेचे ग्राहक जाळे आणि जीवन विम्यातील आमचे कौशल्य यांचा वापर करत विम्यापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्याद्वारे उत्कर्ष बँकेच्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करता येईल.

या भागीदारीमुळे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांना जीवन विम्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील. हे पर्याय बँकेच्या शाखा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, युपीआय आणि डिजिटल मदत पुरवणारी साधने आदींच्या माध्यमातून बँक विविध माध्यमांतून ग्राहकांना प्रदान करणार आहे.

कोटक लाईफने ५ कोटींहून अधिक सक्रिय ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. पॉलिसीधारकांना सातत्याने आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा त्यांचा अनुभव आणि वारसा आता उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांनाही मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande