जळगाव - डोळ्यात मिरची पावडर फेकून व्यापाऱ्याकडील लाखो रुपये लांबविले
जळगाव, 27 फेब्रुवारी (हिं.स.) जिल्ह्यात अमळनेरमधील स्कूटीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्याच्याकडे असलेले साडेपाच लाख रुपये चोरट्यांनी लांबविल्याची घटना अमळनेरमधील पिंपळे रस्त्यावर घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला
जळगाव - डोळ्यात मिरची पावडर फेकून व्यापाऱ्याकडील लाखो रुपये लांबविले


जळगाव, 27 फेब्रुवारी (हिं.स.) जिल्ह्यात अमळनेरमधील स्कूटीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्याच्याकडे असलेले साडेपाच लाख रुपये चोरट्यांनी लांबविल्याची घटना अमळनेरमधील पिंपळे रस्त्यावर घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तीन संशयितांना अटक करण्यात आली.

अमळनेर येथील बाजार समितीतील व्यापारी यतीन कोठारी हे स्कूटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीनमध्ये जात होते. त्या वेळी तीन जण मोटारसायकलवर तोंडाला मास्क लावून आले. त्यांनी यतीन कोठारी यांचा चष्मा काढून फेकला. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकली. त्यामुळे यतीन कोठारी यांच्याजवळ असलेली पिशवी खाली पडली.या पिशवीत साडेपाच लाख रुपये होते. ही पिशवी सोबत घेत चोरटे पसार झाले. घटनेची माहिती यतीन कोठारी यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी संशयितांना पकडण्यासाठी पथक रवाना केले. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande