पिंपरी-चिंचवड महापालिका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
पुणे, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या वतीने ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ४३ देशांतील ११६ चित्रपट विना
पिंपरी-चिंचवड महापालिका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन


पुणे, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड फिल्म सोसायटी आणि गाथा फिल्म सोसायटी यांच्या वतीने ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ४३ देशांतील ११६ चित्रपट विनामूल्य दाखविले जाणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.

आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात भारतासह अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, पोलंड, स्वीडन, सायप्रस, इटली, ट्युनिशिया, इजिप्त, मोरोक्को, लेबनॉन, पॅलेस्टाईन, चिली, ब्राझील, जपान, थायलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण कोरिया, अर्जेंटिना, मेक्सिको, तुर्की, इराण, दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस आदी देशांचा सहभाग आहे.

या महोत्सवात लघुपट, माहितीपट, ॲनिमेशन चित्रपट तसेच दीर्घपट अशा विविध प्रकारच्या चित्रपटांचा समावेश असून सर्व वयोगटातील प्रेक्षकांना लक्षात घेऊन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात सादर होणाऱ्या चित्रपटांमधून विज्ञान आणि अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, समाजव्यवस्था, निसर्ग व पर्यावरण, तंत्रज्ञान, प्रेम व मानवी भावना, महापूर व आपत्ती व्यवस्थापन तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित असे विविध विषय मांडण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande